Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, January 29, 2022

बदलले लोक

मी लोकांना वेळेपेक्षा वेगाने 
बदलताना पाहिले आहे.
हातातून वाळू निसटावी तसे 
जोडलेले लोक बदलतात.
क्षणात नाते तोडून जातात.
मनाची पर्वा करत नाही.
क्षणभर विचार सुध्दा करत नाही.
बुध्दीचा वापर जरा जास्तच करतात.
लोकांचा विकास झाला चार पैसा हाती आला. तसं तो बदलू लागला.
दिल्या घेतल्या वचनांना सुध्दा विसरतात.
आपल्या हाताचे मीठ अळणी म्हणून सोडून द्यावे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


नात

मी लोकांना क्षणात बदलताना पाहिलं आहे.
काय भरोसा ठेवायचा कोणावर
तोंडावर एक पाठीमागे एक बोलतात
आपलंच ऐकून आपल्याच माघारी
आपली चेष्टा मस्करी करतात.
काय म्हणून विश्वास ठेवायचा 
सरड्या सारखे रंग बदलणारे
माणसांची जात आहे.
लोक आयुष्यभराची जवळी
क्षणात तोडतात
आपल्या सोबत लोकांनी बदलून 
नातं तोडण्यापेक्षा
आपणच दोन हात राखून 
राहावं सर्वात चांगल असतं
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time