मी कधीच विसरणार नाही
त्या प्रेमाच्या भावना अजून ही
मनात साठवून ठेवल्या आहेत.
तुझी आठवण येता.
त्या उफाळून वर येतात.
अलगद मनाला स्पर्श करून जातात.
मी तुझ्या सोबत आहे ना
आठवण करून देतात.
तुझ्या त्या प्रेमाच्या भावना कशा विसरु
ज्या मला वेळोवेळी जगायला बळ देतात.
हृदयावर कोरल्या आहेत त्या भावना
ते आपलं पहिलं प्रेम
मी कधीच विसरणार नाही.
त्या प्रेमाच्या भावना मी सरणावर गेले
तरी मिटणार नाही.
त्या ही येतील माझ्या सोबत सरणावर
सोबत करायला.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️