Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, January 31, 2022

आई

आजचा दिवस किती सुवर्ण दिवस आहे.
श्वास तुझा मला देऊ
आई आज तू मला जन्माला घातले.
मी एक जगावं म्हणून तू तुला किती किती ग जपलं 
तू आई झाली तुझी महती किती सांगू 
जन्म मला देताना किती भोगला कळा त्रास 
अंगाई गीत गात तू रात्रीचा दिवस केला. 
माझ्या ग पाळण्याची दोरी तुझ्या हाती होती.
संस्काराचे धडे तू मला दिले.
हट्ट लाड कौतुक नखरे माझे खाण्याचे 
किती किती सगळे ग तू पुरवले 
आवडीनिवडी जपून माझ्या
मला मोठे तू ग केले.
संस्काराचे धडे देऊन कर्तव्य काय
असतं हे ग शिकवले
त्याच कर्तव्य व संस्कारावर मी चालते आहे.
जन्म तुझ्या पोटी घेऊन महान मी झाले ग
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


सोबती

जीवनात गरज असते सोबतीची
मैत्रीरुपी प्रेमाची साथ हवी असते.
आयुष्याच्या सोबतीला 
निर्मळ निस्वार्थी मैत्री हवी असते.
टेंशन कायकू लेना का मैं हूं ना 
म्हणायला कोणी तरी हवं असतं..
प्रेमाने चौकशी करून हक्काने 
ओरडणारे हवं असतं.
अश्रू डोळ्यातील पाहून
हसू आणणारं हवं असतं.
सोबत जरी नसली तरी
साथ देणार हवं असतं.
जीवनात मैत्रीरूपी प्रेमाच्या
सोबतीची गरज असते.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time