Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, January 31, 2022

अंकुर

तुझा तो अंकुर माझ्या 
पोटात होता.
तुझा तो एवढ्याशा जीवच
नात तुझ माझं नाळेन बांधलं होतं.
तुझ्या कौतुकाचे सोहळे
किती रे झाले.
पावलागणिक मी हळूवार
पाऊल टाकले.
एक तू जन्माला यावा
तुला त्रास होऊ नये म्हणून
मी मलाच रे किती किती जपले.
आई होण्याची पुण्याई
नाही रे शब्दात वर्णन करू शकत.
तुझ्या जन्माने आई मी झाले
एक स्त्री म्हणून पूर्ण तू मला रे केले.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


आई

आजचा दिवस किती सुवर्ण दिवस आहे.
श्वास तुझा मला देऊ
आई आज तू मला जन्माला घातले.
मी एक जगावं म्हणून तू तुला किती किती ग जपलं 
तू आई झाली तुझी महती किती सांगू 
जन्म मला देताना किती भोगला कळा त्रास 
अंगाई गीत गात तू रात्रीचा दिवस केला. 
माझ्या ग पाळण्याची दोरी तुझ्या हाती होती.
संस्काराचे धडे तू मला दिले.
हट्ट लाड कौतुक नखरे माझे खाण्याचे 
किती किती सगळे ग तू पुरवले 
आवडीनिवडी जपून माझ्या
मला मोठे तू ग केले.
संस्काराचे धडे देऊन कर्तव्य काय
असतं हे ग शिकवले
त्याच कर्तव्य व संस्कारावर मी चालते आहे.
जन्म तुझ्या पोटी घेऊन महान मी झाले ग
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time