Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 05, 2022

मी कोण

मी कोण मी माझी मी च आहे.
मी मेघा आहे मी राणी आहे.
मी मेंदरकराची लेक आहे.
मी आरबुजाची सून आहे.
माझ्या आयुष्यातील मी
स्वाभिमानी स्त्री आहे.
माझ्या स्वतःसाठी उभी राहिलेली
मी दुर्गा, रणचंडिका, आहे
तेवढीच मायाळू स्वतःवर व दुसऱ्या वर
प्रेम करणारी प्रेमवीरा आहे.
चंद्रा सारखी शितल चांदणी आहे.
रवी सारखी प्रखर तेजस्विनी सुध्दा आहे.
मी लेक, सून, आई, बहिण, मैत्रीण, सासू आजी,सल्ला देणारी सल्लागार,
ऐकून घेऊन समजून घेणारी कोमल मनाची कोमलि का मायाळू आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


तू कोण कसं सांगू

तू कोण कसं सांगू तुला
तू तर माझ पहिलं प्रेम आहे.
माझ्या जीवनातील सोबती 
माझ्या कविता तू 
कवितेतील प्रेम तू 
त्यातील वेडू तू
कसं सांगू तुला 
माझा श्वास तू 
माझं विश्वास तू
माझं सर्वस्व तू
माझ्या जीवनाची पहिलं पान तू
माझ्या जीवनातील शेवटचं पान ही तू
तुझ्या शिवाय मी अपूर्ण आहे रे....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time