Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 05, 2022

तू कोण

वेडू तू कोण आहेस?
माझा मित्र आहेस, स्वप्नातील प्रियकर आहे.
सख्या,सोबती, कि जवळचा सर्व गुपीत तुला माहित असणारा खास हृदयात ठाण मांडून बसलेला. स्वप्नातील खास जवळचा सखा आहेस. तुझ्या शिवाय माझं ही पान हलत नाही. तुला सर्व सांगितल्या शिवाय मला करमत नाही. असा जवळचा खास सखा आहेस रे वेडू कोणी काही म्हणो पण आपली केमिस्ट्री जमली आहे. मरे पर्यंत तुटणार नाही बघ. सरणावर जाताना सुध्दा तुला माझ्या सोबत हृदयात घेऊन जाणार..
वेडू तू असा हा माझा स्वप्नातील खास जवळचा सखा आहेस....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Tuesday, May 03, 2022

मुहूर्त

राणी खूप झाले ग आता मतभेद
ये भेटायला या अक्षय्य तृतीया च्या मुहूर्तावर
मागील सगळ्या मतभेदाला देऊन टाक तिलांजली.
आज आंब्याच्या रस आणि पुरणपोळी असते. त्या सारखंच आपण एकत्र येऊन गोडगोड बोलून मतभेद आपले मिटवून देऊ.
किती दिवस आणि का मतभेद ताणशील
ताणून मतभेदांमुळे काहीच होत नाही.
जातील तुटून मग पश्चात्ताप करण्यापेक्षा योग्य वेळी मतभेद मिटवलेल बरं.
अपेक्षा ना तुझ्या आहेत. अपेक्षा ना माझ्या आहेत. मग का मतभेद ताणतोय ग
येशील ना राणी आजच्या मूहूर्तावर भेटायला वाट पाहतो..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time