पूर्ण आयुष्य आईसाठी दिले तरी कमी पडेल. कारण तिने नऊ महिने माझा भार संभाळून कळा सोसून मला जन्मला घालून मला हे सुंदर जग दाखवले माझे लाड कौतुक केले. रात्रीचा दिवस केला. हाताचा पाळणा केला त्यासाठी माझ्या साठी तूपाची लोटी जिने लपून ठेवली काही झालं तरी माझं साठी तिने वरण भात तूप कायम केले.
त्या आईसाठी एक दिवस काय पूर्ण आयुष्य तिला दिले तरी कमीच आहे.
अशी माझी आई सुशिक्षित आधुनिक विचारांची हौशी होती.
तिने माझ्या सर्व हौस पूर्ण केल्या.
आशा आईसाठी आयुष्य घालवले तरी कमीच आहे.
माझी प्रगती बघायला मला तिच्या साठी काही करायला. मला आता तिची गरज असताना तिचा प्रेमाचा हात पाठीवर फिरवायला तिच्या कुशीत मनसोक्त रडायला ती या जगात नाही.
मुक्तछंद काव्या
मिस यू आई 🙏😥😥