Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, May 09, 2022

श्रीमंती

श्रीमंती नसले तरी चालेल पण मनाने श्रीमंत असावे.भुकेल्याला आपल्या घसातील दोन घास द्यावे.तहानलेल्या पाणी द्यावे.गरजूंना मदत करावी.सुख दुःख वाटून घ्यावे. पैशाच्या श्रीमंती पेक्षा चांगल्या चार माणसांची श्रीमंती हवी. पैसा आज आहे उद्या नसेल.ढिगभर नसली तरी चालतील पण चांगली दोन माणसे सोबत असावी.
स्वभाव सरळ चांगला असावा.समोरच्याच दुःख समजून घ्यावं. माझीच तुला गरज आहे व माझाच तोरा हे नसावा. त्यापेक्षा दुसऱ्या माणसांचं मन जाणता येणं त्या सारखी श्रीमंती नाही. खरं तर हिच खरी श्रीमंती...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Sunday, May 08, 2022

आई

आई तु आजारी होती.
मी तुला प्रत्येक वेळी भेटायला आले की
मला एक रात्र तरी राहा म्हणून मागे लागायची पण मी राहू शकत नव्हते.
मग तू रुसून दुसरीकडे तोंड करून झोपायची. मला खूप वाईट वाटायचे ग
पण काय करणार कर्तव्यात बांधले गेले होते.
तुच दिलेल्या संस्कारावर पाऊल ठेवून चालत होते. माहित नव्हते की असं रुसून कायमच आम्हाला पोरक करून निघून जाशील.
आई तुझी लेक खूप खूप वाईट आहे ग
तुझा विचार न करता मी माझ्या सासरचा
व माझ्या संसाराचा विचार केला ग.
सॉरी म्हणुन हात जोडून माफी मागायला पण तू नाही ग आई
पण तू जेथे असेल तेथून बघत असशील ना
सासरी आज तुझ्या संस्काराचं व तुझ्या लेकीच कौतुक होतोय. 
जो तो म्हणतो मेघा तू होती म्हणून आज हे दिवस दिसतात.
खरंच तुझ्या आईवडीलाचे नाव तू उज्वल केले. यशस्वी संसार केला.मुलाला छान संस्कारी बनवलं.
हे सर्व बघायला व ऐकायला तू हवी होतीस आई तुला अभिमान वाटला असता तुझ्या लेकीचा.
पण ही सल कायम मनात राहिलं तुझ्या सोबत एक रात्र ही मी राहिले नाही ग...
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍🏻✍🏻


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time