Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, May 10, 2022

माझा राजा

माझा वेडू माझं मन 
जिंकणारा माझं मन 
जाणणारा राजा
स्वभाव त्यांचा शांत
मला जपतो‌ काळजी
माझी घेतो.
हवं नको ते विचारतो.
दुःखी मला करत नाही.
सुखांची बरसात करतो.
माझ्या नयनी अश्रू 
त्याला चालत नाही.
माझ मन समजून घेऊन
मला तो जपतो.
मन माझं जिंकणारा
एकच माझा राजा
माझा वेडू माझा वेडू....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Monday, May 09, 2022

वेडू ची श्रीमंती

वेडू श्रीमंत नसला तरी तू चालेल  रे पण माझं मन जाणून घे. नको मला पैठणी आणि नको मला सोन्याचा हार, नको रे मला हिऱ्या मोत्यांचे दागिने. नको मला बंगला गाडी,
पण माझं दुःख जाणून घे.
सुखदुःखाच्या क्षणी माझा खंबीर खांदा तू हो. माझं मन मोकळे करायला संवाद तू साध
हिच श्रीमंती आपल्यात ठेव रे वेडू...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time