Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, May 11, 2022

वाढदिवस

वाढदिवस माझ्या पिल्लूचा असतो. 
आम्ही दोनदा साजरा करतो.
मी आणि पिल्लू मिळून पहिला साजरा करतो. मी त्यांच्या आवडीच जेवण बनवते.
सकाळी आॅफिसला जायचा आधीच
आई बाबांन सोबत औक्षण करून
केक कापून घेतो. मग दिवसभर आम्ही दोघेच असतो. संध्याकाळी त्याला फिरून आणते. त्यांच्या आवडीच श्रीखंड पुरी करते.
जेवण करून झोपून जातो.
आई बाबा रात्री बारा एक वाजता येतात.
कामाने थकून गेलेले असतात.
अहो दोघेही बॅंकेत कामाला पिल्लूचा वाढदिवस 30 मार्चला आणि बॅंकेच मार्च एडिंग मग वेळ कुठला एक एप्रिल मात्र वाढदिवस दणक्यात साजरा करतो..
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Tuesday, May 10, 2022

माझा राजा माझं पिल्लू 😘

मन जिंकणारा माझा राजा
माझं पिल्लू माझी काळजी घेतो.
मी विचार करत बसले तर येऊन माझ्या गळ्यात हात टाकून आजी काय झालं असं विचारतो. आज्जोची आठवण आली का म्हणतो. तू विचार करू नकोस आपले आज्जो बरं वाटलं कोरोना गेला की परत येणार आहे आपण जाऊ त्यांना आणायला अशी माझी समजूत घालतो.
मी रडायला लागले तर माझे डोळे पुसतो. आणि मला म्हणतो आजी तू लडू नकोस.व घट्ट मिठी मारतो. माझा सोबत तो ही रडतो. आणि सांगतो. मी तुझं सगळं ऐकेन
आपले आज्जो येणार आहेत.तू काळजी करू नकोस. मी बाप्पाला सांगितले आहे. माझे आज्जो आहे तसेच मला दे. ते स्टार झालेले मला नको आहेत.
व त्यांच्या फोटो कडे जाऊन त्यांना सांगतो आज्जो परत या आजी लडते मला पण तुमची आठवण येते. तुम्ही मला हवे आहात
मी तुम्हाला आईस्क्रीम वडापाव चाॅकेलेट
देतो. तुम्ही फक्त यायचं काम करा. 
असं माझं मन जिंकणारा माझं पिल्लू 😘
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time