Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 12, 2022

धोका

धोका कधीच कोणाला देऊ नका.
त्यांच्या विश्वासाला तडा देऊ नका. जो कोणी विश्वासाने तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्याला धोका देऊन त्यांच्या गोष्टी इतरत्र पसरू नका.आज जरी तुम्ही धोका दिला तरी नियती सगळं पाहत असते. ती कधी कसा धोका देऊन जाईल कळणार पण नाही. धोका देऊन केलेलं प्रेम ,पैसा, इस्टेट,
कधीच सुखाची घागर भरत नाही. जे काही धोका देऊन मिळवलेल असतं ते असंच फुकटच जात. म्हणूनच कोणाला धोका देऊन काही कमवू नका. व कोणाचा विश्वास धोका देऊन तोडू नका.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Wednesday, May 11, 2022

शुभेच्छा

वेडू तुझा वाढदिवस दरवर्षी यावा
माझं ही आयुष्य तुला लाभो!
मी जरी शुभेच्छा द्यायला नसले तरी
माझ्या शुभेच्छा तुला माझ्या नंतर ही कायम असतील. तू आनंदी सुखात राहावं
मी तुला शब्दरुपी भेट देईल आणि त्या
शब्दरुपातच तुला भेटेन..
नको चंद्र तारे फुलांचे पसारे तुझ्या अडचणीच्या वेळी व गरज असताना मी खंबीर पणे तुझ्या पाठीशी उभी राहिन..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time