Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, May 14, 2022

दिवा

दिवा आपल्या संसाराचा
अखंडित शांतपणे जळत होता.
नियतीला तो सुंदर 
तेजोमय प्रकाश
सहन झाला नाही.
वाऱ्याच्या जोरदार 
झोत आला माझा
दिवा कायमचा शांत
करून गेला...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Friday, May 13, 2022

हृदयात

वेडू मी कशाला जाऊ रे
आरशाच्या खोलीत 
तुझ्याच डोळ्यांत पाहता 
मला माझे प्रतिबिंब दिसते.
तुझ्या हृदयात माझीच
तर छबी दिसते‌.
निरागस आशा 
तुझ्या चेहऱ्यावर
माझेच तर भाव दिसतात.
मग मला तू असताना
आरशाची गरजच पडत नाही...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time