Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, May 15, 2022

दोष

दोष कोणाचा ना तुझा ना माझा
दोष होता माझ्या नशीबाचा
हसत्या खेळत्या संसार आपला होता.
आशा या भरल्या संसारातून
तुला माझ्या पासून 
नियतीने हिरावून घेतले
सांग ना दोष कोणाचा 
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Saturday, May 14, 2022

पणती

मी आहे छोटीशी पणती
समजून घेऊन साथ 
तू मला देशील का??
मी जळते तुझ्याचसाठी
तुझ्या अंगणी प्रकाश देते
नारी आहे म्हणून काय झालं
दोन्ही घरचे नाव रोशन करते.
मी नाजूक वेल माहेरची
तुझ्या अंगणी रोवून घट्ट पाय
तुझ्या पाठीशी खंबीरपणे
उभी मी राहते रे
अंगण तुझं फुलवून
गोड फळे देते रे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time