Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, May 15, 2022

दोष नव्हता

राणी दोष तुझा नव्हता ग
ना तुझ्या नशीबाचा होता.
ना तुझ्या कर्मांचा होता.
जे होतं ते तू स्वीकारले होते
जे होतं त्यात तू समररस झाली होती.
तू स्वतःला दोष देऊ नकोस.
ना तुझ्या नशीबाला कर्माला दोष देऊस.
जे घडायचे ते घडले.
जे आहे ते आता स्वीकारून 
पुढे चल ग राणी
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


दोष

दोष तर कोणाचाच नसतो 
दोष असतो आपल्या कर्मांचा
दोष असतो आपल्या पाप पुण्याचा
दोष असतो आपल्या स्वभावाचा
दोष असतो आपल्या वागणूकीचा
दोष असतो माणूसकीचा
जसं घडवू तसा दोष घडत जातो.
म्हणून दोष कोणालाच देऊ नका
जे जसं आहे ते तसं घडणारच...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time