Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, May 17, 2022

वेडू तुझी झलक

वेडू तुझी झलक बघायला
नयन माझे तरसले आहे.
शब्द तुझे ऐकायला
कान माझे टवकारले आहे.
जीव फक्त तुझ्यासाठी
अडकला आहे.
आता काहीच नको.
धडधड हृदयाची संपत 
आली आहे.
शेवटचा श्वास तुझ्या साठी
राखून ठेवला आहे.
तुला पाहताच तो
शेवटचा श्वासही संपेल.
सरणावर फक्त देह माझा उरेल.
त्या देहाची ही तासा दोन तासांत
राख होऊन जाईल.
ना तुझी झलक मला पुन्हा दिसेल
ना माझी झलक तुला दिसेल.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


राणी तुझी झलक

राणी तुझी एक झलक दिसावी
म्हणून रोजच सकाळ संध्याकाळ
तुझ्या दारा वरून जात होतो.
तुझी झलक दिसता 
मन माझे प्रसन्न होत असे.
जेवणाची तृप्त ढेकर देऊन 
मग मी जात होतो...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time