Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, May 18, 2022

मैत्रीची परिभाषा

मैत्रीतील प्रेमाची परिभाषा
तुला समजेल का?
समजून घेऊन मैत्री
तू करशील का?
मैं हूं ना असं म्हणून 
मला साथ देशील का?
आपली भेट झाली
नाही तरी चालेल
शब्दांचा आधार देशील का?
स्वार्थ अपेक्षा काहीच नाही
निर्मळ, निरागस, निरपेक्ष, 
नितळ आपली मैत्री जपू या
मैत्री नावाच्या आपल्या
परिभाषेला चार चाँद लावून
मैत्रीच आपलं नातं 
आयुष्यभर जपू या...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


प्रेमाची परिभाषा

प्रेमाची ती परिभाषा
आपली खूपच वेगळी होती.
सौंदर्यांची ती अनोखी खाण होती.
ना वासना होती ना अपेक्षा होती.
भेटलो जरी नाही बोललो जरी नाही.
तरी आपल्या नजरेचा सारा खेळ होता.
डोळ्यानीं डोळ्यांना पाहून 
तृप्त आपण होत होतो.
अबोल आशा प्रेमाची 
अबोल अशी प्रेमाची
अबोल आपली परिभाषा होती...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time