Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 19, 2022

दुःख(. चारोळी)

वेदना माझ्या समजून घेशील का?
समजून वेदनेच दुःख माझं
मला कुरवाळून मिठीत
तुझ्या घेशील का?
मेघा...✍🏻✍🏻©️®️


वेदना

बैजू वेदनेच दुःख तुला कळणार नाही.
तू तर हात माझा सोडून वेदनेची कळ देऊन एक दिवसात होत्याच नव्हत करून निघून गेला. तुझ्या पाठीमागे अस जगणं म्हणजे काय असतं हे  फक्त मलाच माहिती
आणि ह्या समाजात असं जगणं समजायला फक्त स्त्रीच्या जन्माला यावं लागतं. 
रोजच वेदनेची कळ मनात घेऊन चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा घेऊन जगत असते.
हास्याच्या मुखवट्या मागची वेदना 
फक्त मलाच माहिती रे बैजू
असं कसं आणि किती वर्ष जगायचं माहित नाही. पण आता कंटाळा आला आहे.
असं वाटतं बस झालं आता हे सर्व पटकन उठाव आणि तुझ्या कडे यावं चटकन 
तुझ्या मिठीत येऊन शांत होऊन जावं
बस झाली आता वेदना आणि बस झालं आता जगणं आता सरणावर कायमची सुखाची झोप हवी आहे.....
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time