Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, May 20, 2022

शब्द

किती रे पहावी वाट
भेट तर शक्यच नाही.
शब्द हि महाग झाले का?
भास आभासच्या दुनियेत
एकदा तरी भेट ना
प्रेमाच दोन शब्द बोल ना..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


आभास

तुझा भास कि तुझा आभास 
छळतो रे मला
तुझीच तर जाणीव करून देतो.
तू सोबत असल्याचा स्पर्श जाणवतो
तुझी ऊबदार मिठी जाणवते.
तुझे गरम श्वास जाणवतात.
तुझ्या हातात हात गुंफलेले असतात.
तुझा ओठांचा स्पर्श ओठांना जाणवतो.
केसांच्या बट्टा शी तुझा चाळा चालू असतो.
कपाळावर तुझं चुंबन घेणे जाणवते.
सांग हे सर्व जाणवणे
भास आहे कि आभास आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time