Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Thursday, May 26, 2022

तुझी प्रतिक्षा

त्या वळणावर जेथे
तू मला पहिल्यांदा दिसली होती.
तेथेच त्या वळणावर
मी अजूनही येतो ग
तुझी प्रतिक्षा करत उभा असतो.
ये ग लवकर राणी
भेट ग तेथेच त्या वळणावर
जेथे सहजच आपली
नजरानजर झाली होती.
आणि मी तुझ्या त्या टपोऱ्या 
डोळ्यात हरवून गेलो होतो...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


निशाची प्रतिक्षा

तुझ्या प्रतिक्षेत रात्र रात्र
जगून मी काढते
लवकर काही तू येत नाही.
जागरणाचा त्रास होऊन
मग वाढते माझी अॅसिडिटी
काय एवढं त्रास देते.
वेळेत येत जा ग निशा राणी
मुक्तछंद काव्या
मेघा....✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time