Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, June 01, 2022

नारी ची चेतावणी

ती तुला खूपदा समजावून
सांगत होती माझ्या
मागे मागे येऊ नकोस.
मला त्रास देऊ नकोस.
शेवटचा उपाय म्हणून तिने
तुला पोलिस कंप्लेंट करते 
अशी ही चेतावणी दिली होती.
पण तू ऐकलं नाहीस.
मी नारी असले तरी 
काही कमी नाही.
हे समजून घे असे म्हणत
ती रणरागिणी दुर्गा झाली.
आणि भर चौकात त्याला शिक्षा केली...
मुक्तछंद काव्या
मेघा... ✍🏻✍🏻©️®️


जीवन एक चेतावणी (लघुकथा)

तो दारु प्यायचा सिगरेट ओढायचा त्याला बायकोने खुपदा सांगितले समजावून अरे आपला सुखाचा संसार आहे. माझ्या सारखी वेळोवेळी साथ देणारी बायको आहे सोन्या सारखी मुलं आहेत.पण तो ऐकायचा नाही.
एकदा त्याला खूप त्रास झाला तिने त्याला अॅडमिट केलं.सर्व परिस्थिती डॉक्टरांना सांगितली त्यातून त्याला मरता मरता वाचवले. शपथ घेतली आता मी दारू पिणार नाही सिगरेट ओढणार नाही..
डॉक्टरांनी पण त्याला चेतावणी दिली आता जर का तू दारू पिली सिगरेट ओढली तर तुझं काही खरं नाही. बायको ची पुण्याई होती म्हणून आता वाचला आहेस.त्याने मान हलवून आता कुठलच व्यसन करणार नाही असं म्हणाला आणि वचन देऊन दवाखान्यातून बाहेर पडला. तो थेट प्यायला गेला. ती हतबल झाली. 
तिने खूप समजावून सांगितले पण तो ऐकला नाही पुन्हा त्यांचे पूर्वीसारखेच व्यसन चालू झाले. सिगरेट ओढून ओढून खोकला सुरू झाला पुन्हा दवाखान्या सुरू झाला तेव्हा डॉक्टरांनी त्याला चेतावणी दिली.
आता तरी सिगरेट दारू बंद कर नाहीतर
कॅन्सर होईल पण तो ऐकत नव्हता. आपल्याच मस्तीत जगत होता.
बायको ही हातापाया पडून जीव तोडून त्याला सांगायची पण त्याने ऐकलेच नाही.
आणि व्हायचा तो परिणाम झाला त्याला कॅन्सर झाला. तेव्हा ती म्हणाली डॉक्टरांनी एवढी चेतावणी देऊन ही तुम्ही ऐकलं नाही आता आपल्या कर्माची फळे भोगायला तयार होऊ आणि तिने स्वतःचे मन घट्ट करून त्यांच्या वर औषध उपचार सुरू केले.
पण काही उपयोग झाला नाही. त्यात त्यांचा अंत झाला.
ती रडून रडून सांगत होती डॉक्टरांनी एवढी चेतावणी दिली मी ही किती समजावून सांगत होते पण तुम्ही ऐकलंच नाही.सुख भोगायची सोडून मरणाला जवळ केलं..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time