Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, June 01, 2022

चेतावणी (लघुकथा)

राणी तुला कितीदा सांगितले होते.
दर वेळी मी तुला चेतावणी देत होतो.
भूतकाळात अडकू नकोस.तुझ्या पुढ्यात वर्तमान आहे.तो जग भविष्याचा विचार करू नकोस.
जे मागे झालं ते सर्व विसरण्याचा प्रयत्न कर
मला माहित आहे.ते सर्व विसरण अवघड आहे. तुझा तुझ्या वेडूवर खूप जीव आहे.
तू त्यांच्या साठी तुझे प्राण ही द्यायला तयार आहेस. पण तो कोठे आहे माहित आहे का?
त्यांच्या सोबतची सर्व स्वप्न पाहायची बंद कर
तुझ्या विचार कर स्वतःसाठी जग पण तू ऐकत नाही.
त्याचा विचार त्याच्याच स्वप्ननात गुंतवणूक घेते.बस झालं ग आता तरी ऐक
झाला तेवढा मनस्ताप खूप झाला..
त्या सर्वांचे परिणाम फक्त तुलाच भोगायला लागले ना आणि त्रास ही तुलाच झाला ना?
आता सर्व बंधन झुगारून देऊन मोकळा श्वास घेऊन स्वच्छंदी मनाने जगायला लाग.
कुठला हि कोणाचा ही विचार मनात आणू नकोस...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Monday, May 30, 2022

स्वाभिमान (चारोळी)

माझं पहिलं प्रेम वेडू तू...
दुसरा स्वाभिमान होता माझा...
म्हणूनचं वेडू म्हणायचा...
वाटतो राणी अभिमान तुझा...
  मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time