Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, September 28, 2021

स्त्री मनाची व्यथा

कोणी ऐकून घेईल का
स्त्री मनाची व्यथा
कोणी समजून घेईल का
तिच्या भावना.
स्त्री म्हणून कुठेच कमी पडत नाही.
सर्वांचं सर्व करते.
घरासाठी राबराब राबते.
तिची कामे पहाटे
उठल्यापासून चालू होतात.
ती रात्री उशिरापर्यंत सुरू असतात.
सर्वांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून
सर्वांना सर्व करून देते.
घरचा व्याप सांभाळून
बाहेरील कामे करते.
नोकरी करून घर सांभाळते.
तिची तरी अक्कल काढली जाते.
आपलं घरदार सोडून
आईवडीलांना सोडून सासरी येते.
सासरच नाव मोठं करते.
परिस्थिती आहे तशी राहते.
नवरा कसाही असला तरी साथ देते.
सासू सासरे नणंदा जावा 
दिराचे सगळं करते.
पै पाहुणे सर्व संभाळून घेते.
आपला संसार नेटानं करते.
मुलांच शिक्षक करते
मुलं उच्च पदावर काम करतात.
असं कोणी म्हणत नाही.
थकली असशील बस जरा
एक कप चहाचा कोणी तिला देत नाही.
कोणी असं ही म्हणत नाही.
तू होती म्हणून सर्व झाले.
तिचं ऐकून ही कोणी घेत नाही.
स्त्री मना तुझी व्यथा तुझीच कथा.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


2 comments:

  1. खुप छान व्यतीत झाले मन, अप्रतिम रचना लिखाण

    ReplyDelete
  2. खुपच छान व्यथा मांडली आहेत...
    अतिशय सुंदर...

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time