माझा काय अपराध होता.
मी एक स्त्री होते मी सुंदर होते.
देवाने बनवताना सढळ हाताने बनवले.
देवा रंग दिला, रूप दिले, उंची दिली,
छान टपोरे डोळे दिले,
नाजूक गुलाबी ओठ दिले, बुध्दी दिली,
सहनशक्ती दिली, स्वाभिमान दिला.
देवाने मला काहीच कमी केलं नव्हतं.
मी एक स्त्री असूनही
कोठेच कमी पडले नव्हते.
सुखाने जगत होते.
आनंदाचे राहत होते.
माझा कोणालाच काही त्रास नव्हता.
का मग माझ्यावर
त्या नराधमांनी वाईट नजर टाकली.
माझी अब्रु लुटून मला वेशीवर टाकले.
माझा काय अपराध होता.
आता लोकांच्या नजरा मला वेळी अवेळी बलात्कारी म्हणून सतावतात.
बलात्कारी म्हणून सतावतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
निःशब्द.. 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteअगदी खरी खंत व्यक्त केली आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDelete👌👌👌👌🙏🙏🙏
ReplyDelete