Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, October 01, 2021

माझी मलाच परवानगी आहे

जग बदल दुनिया बदलली
हे खरंच आहे का?
माणूस फक्त स्वतः पुरता बदलला
दुसऱ्यासाठी ना जग बदललं,
ना दुनिया बदलली ना माणूस बदलला.
अजूनही लोकांचा बघण्याचा
दृष्टिकोन तसाच आहे.
माझी मला परवानगी आहे.
घरच्यांची मला साथ आहे.
मी स्वसंरक्षणासाठी ना मंगळसूत्र काढलं,
ना टिकली काढली,ना चाफ्याची फुले घालायची सोडली.
ना छान आवरून तयार होऊन
बाहेर पडायचं सोडलं
जशी पूर्वी होते तशीच 
आताही राहते आहे.
जी कामे पूर्वीकरत होते
तिचं कामे आताही करते.
माझं काम आहे
रिअल इस्टेट एजंटच
ते चालूच आहे.
ऐनपन्नाशीत मला वैराग्य
जीवन नाही जगायचं
मी स्वतःपासून बदलायला
सुरुवात केली आहे.
दुःख तर माझं डोंगरा एवढं आहे.
ते कधीच कमी होणार नाही.
त्यांची कमी कधीच भरून निघणारी नाही.
दुःख मनात ठेवून हसऱ्या चेहऱ्याने 
जगणार आहे.जगणार आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


3 comments:

  1. वाह! अतिशय सुंदर ग

    ReplyDelete
  2. अप्रतिम 👌
    जग बदलत आहे आपणही बदललं पाहिजे ..!
    पण आहे त्यात...!
    तो आपणच ठरवायचा..!
    भल्या बुर्या गोष्टीचा विचार करून.. !
    खूपच छान लिखाण केले आहे..!🌹
    आबा...🙏

    ReplyDelete
  3. अप्रतिमच ....खूप खूप सुंदर👌👌👌👌💐💐💐💐

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time