Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, October 18, 2021

खिडकी

त्या खिडकीतून आभाळ दिसायचं.
तो छान पौर्णिमेचा दुधाळ चंद्र 
त्याचा जवळ तो शुक्रतारा
त्या दोघांची सुबक जोडी दिसायची.
त्या छान चमचम करण्यारा
चांदण्यांनी सजलेल आभाळ
जणू काही कोणीतरी चमचमणाऱ्या
फुलांची उधळण केली आहे.
तो गार वाराचा झोत अंगावर यायचा
तो मला सहन नाही वाहायचा
सख्या तुझ्या मिठीची
आठवण करून द्यायचा.
मग मी ती खिडकी बंदच ठेवते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


5 comments:

  1. अप्रतिम व्यक्त झाल्यात मॅम 👌👌👍

    ReplyDelete
  2. सुंदर रचना केली मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  3. व्वा व्वा खुप सुंदर ������

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  5. खूप सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time