तू आज पासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्र उत्सवात
आई अंबाबाईचा आई जगदंबेचा
तू उदोउदो करशील.
तुझ्या हाताने तिची सेवा चाकरी करशील.
नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करशील.
नऊ दिवस देवीची जोशात साजरे करशील.
नऊ दिवसा नंतर त्याचं सेवा केलेल्या
हातांनी नाजूक कोवळ्या कळ्या कुस्करून टाकशील.
गर्भातच त्यांना मारून मोकळा होशील
आई बहिण वाहिनी ताई मुलगी
काहीच विचार
न करता तिच्या शरीराची लक्तरे तोडशील.
तरुण म्हातारी मध्यम वय लहान कुमारिका
एवढंच काय पण चार पाच वर्षांची पण
तुला तुझ्या वासनेचा डोंब शांत
करायला चालतील.
हिच का रे तुझी देवी उपासना
देवीसारख्या निर्मळ स्त्रीला तुझ्या
घाणेरड्या हाताने बरबटून टाकणे.
हिच का रे तुझी नऊ दिवसातील
देवीची पूजा.
जिचा सन्मान तुला करता येत नाही.
तेथे तुला देवीचा उत्सव करण्याचा
काय अधिकार आहे.
स्त्री शांत आहे शांतादुर्गा सारखी
तो पर्यंत तुझी पूजा मान्य करेल.
एकदा का ती रणरागिणी चंडिका दुर्गा
झाली तर तुझा शेवट झालाच म्हणून समज.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
खरच विचार करायला लावणारी कविता आहे खुपच वास्तविक आहे बरोबर आहे
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि मार्मिक रचना केली ताई👌👌👌👌
ReplyDeleteवास्तव मांडले सखी 👍👍
ReplyDelete