तुला कोरोना झाला होता.
तुला हॉस्पिटलमध्ये दाखल करून आले.
तू मला न सांगता, मला न भेटता
त्या हॉस्पिटलमध्ये तू शेवटचा
श्वास घेतला.
एकेकाळी त्याच हॉस्पिटलमधून
मरणोत्तर परिस्थितीतून
तुला खणखणीत बरं करून
घेऊन आले होते.
त्या हॉस्पिटलवर माझा
खूपच विश्वास होता.
तेथेच तुझ्या वर काळाने घाला घातला.
त्या हॉस्पिटलच्या आजूबाजूला ही
मी जात नाही.
त्या हॉस्पिटलकडे वळून
ही बघत नाही.
तुझ्या आठवणीचा
मला खूप त्रास होतो रे
म्हणून पुन्हा तेथे जाणे नको
मागे वळून बघणे नको.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
निःशब्द.. 🙏🙏
ReplyDelete😔😔😔😔🙏🙏
ReplyDeleteखूपच हृदयस्पर्शी रचना🙏🙏
ReplyDelete😔😔😔kupach sad😔😔
ReplyDeleteहृदस्पर्शी रचना..👌👌👌
ReplyDelete