देऊ सोडून रात्रीच भांडणं
वाद आता वाढवू नकोस.
चहा देतो तुला हवा तसा
कमी साखरेचा गरमागरम
लवकर कर डबा आॅफिसला पळतो.
तुझ्या साठी येताना आणतो
चाफ्याचा गजरा
तो पर्यंत तू मनातील
कटुता कुटुन कुटुन बारीक कर
संध्याकाळी हसतखेळत फिरायला जाऊ
बाहेरचं मग जेवण करून येऊ
भरपेट वर आईस्क्रीम खायला घालतो.
सर्दी झाली की काळजी ही घेईन
प्रेमानी तुला जवळ घेतो.
अजून काय करू राणी
मला सांग इच्छा तुझ्या पुऱ्या करतो.
आता तरी रुसवा सोड ग राणी
रात्रीच भांडणं मिटव ग राणी
राणी आता कुटुता संपव ग
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .