Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, December 21, 2021

ओझी

तुझ्या उद्वेगाची कल्पना
मला करवत नाही.
वेडू किती सांगू तुला समजावून
तुझ्या अडचणी आता तू सोडव.
प्रत्येक वेळेस मला गृहित धरू नकोस
तू तरी समजून घे रे माझ्या मनाला
तुला साथ कायम देईल
सोबत माझी राहिलं रे
अपेक्षा मात्र ठेवू नकोस.
तू आणि मी जीवनाच्या वाटेवर 
आता एकटच चालायचं आहे.
मला माझीच ओझी आता झेपत नाही.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time