आई वडील घराचा पाया आहेत.
वृद्ध झाली म्हणून का झाले
तुझेच तर आई-बाबा आहेत.
त्रास देतात थोडा
वयोमानानुसार सांडलवड होते.
ऐकायला थोडं कमी येत.
हळूवार पणा येतो.
तब्येत पूर्वी सारखी साथ देत नाही.
तू घे ना थोडं समजून.
तू ही होता लहान तेव्हा
ते ही घेत होते ना समजून
तुझे हौसेने कित्तीतरी केले लाड
तुझे सगळे हट्ट पुरवले
हात धरून चालायला शिकवले
त्यांनी तुला मऊमऊ वरण भात
खाऊ घातला.
तुझ्या साठी घोडा झाले.
तुटपुंज्या पगारात त्यांच्या इच्छा मारुन
तुला शिकवून साहेब बनवले.
विसरलास का रे सगळं
तिच्या मागेमागे फिरणं
आई-बाबा मैं हूं ना
तुम्ही कशाला काळजी करता म्हणणारा
कोठे रे लुप्त झाल त्यांच
ते निरागस कोकरू
तुझ्या घरात त्यांना राहू दे.
तुझ्या लेकरांना दुधावरच्या सायी
प्रमाणे जपतील.
त्यांचीपण ती नातवंडच
त्यांना वळण छान लावतील.
तुम्ही निश्चिंत आॅफिसला जायला मोकळे.
तुला काहीच का नाही कळावे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .