संकटे आली गेली
कष्टे करून झाली.
सुख दुःखाचे भोग भोगून झाले
कित्येकांनी दुखावले मन
कित्येकांनी केली शब्दांची उधळण
जखमा देऊन गेले बरेच जण
शालजोडीतले देऊन मनाला दुखवून
हसऱ्या चेहऱ्याने गेले बरेच जण
मी हि ठाम होते साठवले सर्व मनात
बांधून त्या साऱ्यांचे गाठोडे ठेवले
मनाच्या तळाशी
लपवून पापण्या आड पाणी
हसरा चेहरा घेऊन
मी नेहमी आनंदी राहण्याच्या
इच्छेवर जगले.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .