Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, January 08, 2022

माणूस

माणसा रे माणसा तू माणूस म्हणून
जन्माला आला माणूस म्हणून जग
का रे हैवान होतो.
तुझ्या एकट्या वागणूकी मुळे
सारी माणूस जात बेईमान होते.
माणूस म्हणून जगताना काही नियम स्वतःला
तू घालून घे.
कुठलीच गोष्ट इच्छा झाली म्हणून झडप घालून जनावरं सारखी घ्यायची नसती. 
एवढं तरी गोष्ट तू लक्षात ठेव. 
सुखाचे दिवस आले तर उतू मातू नकोस
दुःखाचे दिवस आले तर सहनशीलता ठेव.
स्वतःच काय चुकलं हे जरा बघून घे.
दुसऱ्याच्या माथ्या वर दगड त्याचे फोडू नकोस.
माणसा रे माणसा माणूस म्हणून जग
स्वतःच्या मनाला काय वाटतं हे जरा समजून घे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time