Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, May 29, 2022

गुन्हा कोणाचा

सख्या गुन्हेगार तू का मी रे..
असं अर्ध्यावर सोडून गेलास
सांग ना गुन्हा कोणाचा
तुझा कि माझा का माझ्या नशिबाचा
एकटीने राहणं काय असतं 
तुला कळणार नाही रे..
किती हि मुखवटा घातला
तरी मुखवटा मागचा चेहरा
जीव माझा जाळतो रे..
गुन्हा तर माझाच आहे
माझ्या नशीबाचा आहे.
खरी गुन्हेगार मी आहे.
म्हणूनच जळत जळत जगत आहे.
तू पुण्यवान होता म्हणूनच
या गुन्हेगारी जगाचा निरोप घेतला..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time