Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, May 30, 2022

दुसरं प्रेम

तुम्ही माझं पहिल प्रेम
दुसरं प्रेम माझं पिल्लू
तेच तर दुसरं प्रेम
आता माझा मोठा आधार आहे.
प्रेमाने मला विचारतो.
आजी मी सांभाळतो तुला
तू काळजी करू नकोस
मी आहे ना तुझं पिल्लू
तू रडू नकोस म्हणत माझे
डोळे पुसून गोड मिठी मारत
आणि रोज आज्जोना सांगतो
आज्जो परत या आजी रडती
तुमची आठवण काढते..
असं माझं काळजी घेणार
माझं पिल्लू दुसरं प्रेम...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time