Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, December 22, 2021

कष्टाची काळजी केली नाही (अलक कथा)

तिने कष्टांची तमा कधीच बाळगली नाही.
नवऱ्याच्या माघारी अहोरात्र दुसऱ्याच्या शेतात कष्ट करून
मुलाला उच्च शिक्षण दिले.  का तर तो शिकून सवरून मोठा साहेब होईल व आपले हे कष्टाचे दिवस संपतील.
कधीतरी आपले सुखाचे दिवस येतील
मुलांसोबत सुखाने चार दिवस राहता येईल.
म्हणून त्याला कधीच कशाची कमी जाणवून दिली नाही.
जे हवं ते जे मागायचा ते तिने कष्ट करून वेळेला स्वतःअर्धी भाकरी
खाऊन दोनच लुगडी वर्षभर वापरून
स्वतःची हौसमौज इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या.
कष्ट हेच माझं पंढरपूर काशी चारधाम यात्रा असं समजून स्वतःला कष्टात झोकून दिल.
व मुलाला मोठा साहेब बनवल.
तो उच्च शिक्षण घेऊन साहेब बनून 
तिला येथेच खेड्यात ठेवून निघून गेला.
आता ती द्वेष मनात न करता तमा न बाळगता स्वतःच्या अर्धी भाकरीसाठी कष्ट करते.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


तमा

राणी तू सोबत असताना
मला कसलीच तमा नव्हती.
प्रत्येक गोष्टीची तू काळजी घेत होती.
संसाराच ओझं तुझ्या मुळे
खूपच हलकं झालं होतं.
प्रत्येक नातं तू मनापासून संभाळत होती.
कोणी काही बोललं तरी
तू कधीच कोणाचा द्वेष केला नाही.
कुठलीही अडचण आली तरी 
तुझ्या कडे उपाय होता.
जादूच्या झप्पी सारखी
ती अडचण तू लगेच सोडवायची.
आता मला हे सर्व सावरणं अवघड आहे.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time