Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, December 29, 2021

छंद

छंद हा जोपासावा
मन त्यात रमून जावं
सुखाचे चार क्षण 
छंदात मिळावे.
मनातील दुःख त्यात
विसरून जावे.
सुखाची एक लहर त्यात 
येवून जावी.
आनंदाने मन भरून यावे.
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


Tuesday, December 28, 2021

आभास

सखी स्वप्नात जगता जगता
आभासी दुनियेत जगू लागलो.
जनी स्थळी पाषाणी तुझेच 
भास होऊ लागले.
वेड्यासारखं तुझ्या प्रेमामागे
धावू लागलो.
तुझ्या एका भेटीची प्रतिक्षा 
करू लागलो.
तुझ्या एका मिठी साठी तरसू लागलो.
तुझ्या रसरशीत गुलाबी ओठांच्या  चुंबनासाठी वेडा होऊ लागलो.
तुझा आभास हा भास हा छळतो मला
मुक्तछंद काव्या
   मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time