Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, January 08, 2022

माणूस

माणसा रे माणसा तू माणूस म्हणून
जन्माला आला माणूस म्हणून जग
का रे हैवान होतो.
तुझ्या एकट्या वागणूकी मुळे
सारी माणूस जात बेईमान होते.
माणूस म्हणून जगताना काही नियम स्वतःला
तू घालून घे.
कुठलीच गोष्ट इच्छा झाली म्हणून झडप घालून जनावरं सारखी घ्यायची नसती. 
एवढं तरी गोष्ट तू लक्षात ठेव. 
सुखाचे दिवस आले तर उतू मातू नकोस
दुःखाचे दिवस आले तर सहनशीलता ठेव.
स्वतःच काय चुकलं हे जरा बघून घे.
दुसऱ्याच्या माथ्या वर दगड त्याचे फोडू नकोस.
माणसा रे माणसा माणूस म्हणून जग
स्वतःच्या मनाला काय वाटतं हे जरा समजून घे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Friday, January 07, 2022

लाडीकवाणे छळणे

वेडू तुझं ते स्वप्नात येऊन छळणे
छळून छळून त्रास देणे.
किती रे त्या ओठांशी मस्ती करणे.
गालचा गालगुच्चे घेणे.
केसांच्या बटा लाडीकवाणे ओढणे.
चाफ्याच्या फुलांची उधळण करणं
तुझ रोजच झालं आहे.
स्वप्नात येऊन गोड छळण.
असं वाटतं त्या गोड स्वप्नातून 
जागच येऊ नये. 
तुझ्या त्या छळण्यात गुंग होऊन जावं.
असं वाटतं तुझ्या त्या स्वप्नांच्या
मिठीत असंच झोपून जावं.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time