Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, January 18, 2022

मैत्री अनंत {अलक कथा}

तिने मैत्री केली होती रे
तुझ्या सोबत विश्वासाने
तिच्या अपेक्षा काहीच नव्हत्या रे वेडू
तुझ्या मैत्रीच्या छायेत
ती उमलत फुलत होती.
त्रास दुःख विसरून तुझ्या मैत्रीत सामावत 
होती.
तुझ्या कडून नव्हती रे एका रुपयांच्या चॉकलेट 🍫 ची पण अपेक्षा
तिला तुझ्या कडून हक्काचे काळजी घेणारे दोन शब्द हवे होते.
तू जरी झाला निशब्द तरी तिची मैत्री राहिले रे अनंत ती अनंतात विलीन झाली तरी मैत्री कायम राहील.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


मैत्रीच नात

नाते आपले खऱ्या मैत्रीचे 
विश्वासाने जपू या
एकमेकांना साथ देत
शेवटच्या क्षणापर्यंत ठेवू या
आपल्या नात्यात अविश्वासचे
काही क्षण येतील
कोणी जाईल सांगून
आपल्यात फुट पाडण्यासाठी
तडे आपल्यात करतील निर्माण
मन आपलं दुखवून न देता.
एकमेकांशी बोलून गैरसमज 
दूर करु या.
आपली मैत्री तोडण्यात
किती येवोत संकटं
आपलं मैत्रीच नात 
अजून घट्ट करून 
मैत्रीच नात आपल 
असंच अनंत ठेवू या.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time