Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, January 18, 2022

मैत्रीच नात

नाते आपले खऱ्या मैत्रीचे 
विश्वासाने जपू या
एकमेकांना साथ देत
शेवटच्या क्षणापर्यंत ठेवू या
आपल्या नात्यात अविश्वासचे
काही क्षण येतील
कोणी जाईल सांगून
आपल्यात फुट पाडण्यासाठी
तडे आपल्यात करतील निर्माण
मन आपलं दुखवून न देता.
एकमेकांशी बोलून गैरसमज 
दूर करु या.
आपली मैत्री तोडण्यात
किती येवोत संकटं
आपलं मैत्रीच नात 
अजून घट्ट करून 
मैत्रीच नात आपल 
असंच अनंत ठेवू या.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time