Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, January 25, 2022

कठफुतली

आयुष्याचा चित्रपट चालू आहे
चित्रपटाची कथा वेगळी असते.
जन्माला येऊन एन्ट्री होते.
बालपण सुखाच असतं.‌
कसली काळजी नाही
कसली जबाबदारी नाही.
मस्ती मजा खाणे पिणे
लाड कौतुक हट्ट पुरवूण घेणे हे सगळ
होतं मोठे कधी होत समजत नाही.
काॅलेज प्रेमप्रकरण एन्जॉय करत.
आयुष्याचा चित्रपट मध्यांतरावर येतो.
पुढील एंट्री असते कर्तबगारीची 
लग्नाच्या बंधनात बांधून घेऊन चालू होतं  जबाबदाऱ्या कर्तव्य काळजी टेंशन
आनंदाने तर काही दुःखाने भरलेल्या या रंगभूमीवरचा कलाकार थकून भागून पार पाडून या चित्रपटाचा शेवट होतो.
शेवट झाल्यावरच कळत तो आयुष्याचा चित्रपट व कलाकार कसा होता.
आयुष्याच्या चित्रपटातील त्या कलाकाराच कौतुक मात्र स्मशानात गेल्यावरच होत.
बाबूमोशाय ये जिंदगी हैं जिंदगी
हम सब यहाँ की कठपुतली हैं!
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


  



आयुष्य चित्रपट

आयुष्य एक चित्रपट आहे
कधी आनंदाने तर कधी दुःखाने भरलेले आहे.
येथे आपण सारेच कलाकार आहोत.
दिग्दर्शक म्हणजे नियती
सगळं तर ती नियती आणि आपले कर्म ठरतात.
आपण फक्त कठफुतली बाहुल्या आहोत.
कधी आनंदाचे चित्रीकरण तर कधी दुःखाचे चित्रीकरण जो रोल देईल तो रोल त्या क्षणाला करायचा.
ओठावर हसू ठेवून डोळ्यात आसू ठेवून
आनंदाने जगतो दाखवायचे.
दुःखाने भरलेल्या आयुष्यात ही हसून
जगायचे.
आनंदाने भरलेल्या आयुष्यात ही दोन अश्रू ढाळून जगायचे.
चांगले कर्म करा चित्रपटाचा शेवट चांगलाच होईल
वाईट कर्म करा चित्रपटाचा शेवट वाईटच होईल.
म्हणून आयुष्यचा चित्रपट चालू आहे तोवर चांगले कर्म करावे
चित्रपटचा शेवट चांगलाच होईल.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time