Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, May 21, 2022

नातं

तुझ्या माझ्या नात्याला
तुच रे निर्जीव बनवत आहे.
मी आपलं नातं सजीव ठेवण्यासाठी 
किती रे धडपडत आहे.
साथ तु ही थोडी दे.
संवाद आपलं साधत राहू
एक पाऊल मी पुढे करते
एक पाऊल तू ही पुढे ये.
शिष्टपणा बाळगून काहीच होत नाही.
फक्त नात्यातील गोडवा 
कमी होऊन वीण उसवली जाईल
शिष्टपणा मला ही खूप पाळता येतो.
स्वाभिमान माझा आडवा आला तर
नातं आपलं कायमच दुरावले जाऊन
संपून जाईल..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Friday, May 20, 2022

राणी (चारोळी)

राणी रात्र रात्र जागून काढतो...
तुझ्या ग भास आभासात..
जवळी तू तर नसते ग...
पण छळते ग किती स्वप्नात...
मेघा...✍🏻✍🏻©️®️


Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time