Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, September 28, 2021

बेभान क्षणी

मनाला धुंद करणारं
मनाच्या धुंदीत मी एकटीच होते.
मनाच्या लहरीत मी एकटीच होते.
तू येऊन मनाला स्पर्शून गेला.
तुझी भुरळ घालून गेला.

सांग ना मनाला स्पर्शून जाताना 
दोन मिनिटे थांबला का नाही.
तुझी भुरळ घालून जाताना
दोन शब्द बोलला का नाही.

मनाच्या एकांतात तुझ्या मध्ये 
धुंद होताना तू मला परत भेटला का नाही.
तुझ्या शिवाय जगताना त्रास मला किती झाला.
तुझ्या शिवाय राहताना दुःख मी किती भोगले
तुला काय माहित तुझ्याच धुंदीत मी माझं
आयुष्य कसं जगले.

आयुष्यात पुन्हा कधी भेटून 
मनाला धुंद करून जाशील का
राहिल्या प्रश्र्नांची उत्तरे देशील का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


6 comments:

  1. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  2. वाहा... अतिशय सुंदर व सुरेख...

    ReplyDelete
  3. फारच छान लिहिलंय ����

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना .....👌👍✍️🍫

    ReplyDelete
  5. खूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  6. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time