मनाच्या धुंदीत मी एकटीच होते.
मनाच्या लहरीत मी एकटीच होते.
तू येऊन मनाला स्पर्शून गेला.
तुझी भुरळ घालून गेला.
सांग ना मनाला स्पर्शून जाताना
दोन मिनिटे थांबला का नाही.
तुझी भुरळ घालून जाताना
दोन शब्द बोलला का नाही.
मनाच्या एकांतात तुझ्या मध्ये
धुंद होताना तू मला परत भेटला का नाही.
तुझ्या शिवाय जगताना त्रास मला किती झाला.
तुझ्या शिवाय राहताना दुःख मी किती भोगले
तुला काय माहित तुझ्याच धुंदीत मी माझं
आयुष्य कसं जगले.
आयुष्यात पुन्हा कधी भेटून
मनाला धुंद करून जाशील का
राहिल्या प्रश्र्नांची उत्तरे देशील का?
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteवाहा... अतिशय सुंदर व सुरेख...
ReplyDeleteफारच छान लिहिलंय ����
ReplyDeleteअप्रतिम रचना .....👌👍✍️🍫
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय 👌👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👌👌👌
ReplyDelete