मी नाविक संसारात तशी तरबेज होते.
आपण दोघे संसाराच्या नावेत
बसून छान नौका वल्हत होतो.
संसार रूपी नौका पार करून
किनाऱ्यावर पोहोचत होतो.
निवांत क्षण किनाऱ्यावर
बसून आनंद लुटायचा होता.
दैवाने तुझा हात माझ्या हातून
सोडून घेतला.
तू माझा हात सोडून
निवांत किनारावर बसला आहे.
आता आपली नौका डगमगते.
एकटीला वल्हे मारता येत नाही.
विचारांच्या पुरात वाहते आहे.
वाट तिला नीट सापडत नाही.
मी किनारा शोधते आहे.
आता एकटीनेच नौका वाहायची आहे.
सत्य एकच आहे.
किनारा लागे पर्यंत एकटीच
नौकेत बसून नौका वाहायची आहे.
मला किनारा लवकरच लागू दे.
मला तुझ्या जवळी लवकर येऊ दे.
नौका घेऊन एकटीलाच प्रवास आता नको आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
खुप भावस्पर्शी 👌👌🙏🏼🙏🏼
ReplyDeleteहृदयस्पर्शी कविता ✍️👌👌👌
ReplyDeleteभावनास्पर्शि रचना...
ReplyDeleteहृदयस्पर्शी रचना 👌👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteहृदयस्पर्शी काव्यरचना केली सखी ✍️��
ReplyDeleteहृदयस्पर्शी लेखन केले सखी ✍️
ReplyDelete