Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, October 08, 2021

माझा बेत

तू मला एकटीला त्या निर्जन स्थळी
भेटायला बोलावलं
मला तेव्हाच तुझा बेत कळला होता.
प्रेमाच्या जाळ्यात मुलींना अडकवून
फसवून करून
तुझी पापी नजर त्यावर टाकतो.
हे मला माहित होते.
मी म्हणूनच तुझ्या सोबत प्रेमाच नाटक
करून.
माझा बेत आखून जाळ विणलं होत.
तुला रंगेहाथ पकडायच होत
मी पण म्हणून तू बोलावलेल्या स्थळी
निर्धास्त दिमाखात नटूनथटून आले होते.
तुला पाहून गोड गोड बोलून
प्रेमाच नाटक चालू केलं.
तुझ्या अपेक्षा वाढल्या तेव्हा
इशारा करून 
पोलिसांच्या हातात देऊन
तुझा बेत हाणून पाडला.
तेव्हा कुठे माझं समाधान झालं.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️





7 comments:

  1. वा, खूपच सुंदर रचना आणि तुमचा बेत👌👌👌

    ReplyDelete
  2. वाह नराधमाला पकडण्याचा चांगला बेत आखला

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  4. छान रचना केलीत

    ReplyDelete
  5. छान रचना केली 👌👌👌

    ReplyDelete
  6. खूपच छान...👌👌

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time