Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, December 14, 2021

समजून उमजून घे

मी माझे म्हणणे लादत नाही
कधीतरी माझं समजून घे ना
कधीतरी उमजून घे ना
मला नको रे गाडी बंगला 
सुखसुविधानी भरलेलं घर
मला हवं आहे
तुझं ते पूर्वीच निरागस प्रेम
तुझं भुणभुण करत
माझ्या मागेमागे फिरणं
मला समजावून घेणारा
तुझ्या हातचा तो गरमागरम चहा
आपण एकत्र जेवणं करणं
सुट्टीच्या दिवशी आपल्या
छोट्याशा टु व्हीलवर 
मस्त फिरून येण.
चाफ्याची फुले घेणे.
त्या फुलांची माझ्यावर 
धुळण करणे
किती किती मजा यायची
आता बास झालं रे
सगळी जबाबदारी संपली
वाटेवरच्या शेवटच्या संध्याकाळी
मला तो पूर्वीचा तू हवा आहेस.
आयुष्याची राहिलेली संध्याकाळ
आता पुन्हा पूर्वी सारखी एकत्र घालू
मी माझं म्हणणं लादत नाही पण
मला आता पूर्वीचा तू हवा आहेस.
समजून घे ना
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time