समजून घेत नाही.
अग माझी राणी बाहेर पड ग
दुःखातून कितीदा सांगितले.
आता मोकळी होऊन वावरत जा.
जरा डोळे उघडून बघ
स्वतःकडे स्वतःची काय अवस्था
करून घेतली आहे.
नीटनेटकेपणे राहायला लाग.
चारचौघात उठबस सुरु कर.
दुःखाला किती दिवस कुरवाळत
बसणार आहे.
पूर्वी सारखी परत
हसती खेळती हो.
मी माझे म्हणणे लादत नाही ग
तू मला समजून घेत नाही.
तुझ्या चांगल्या साठीच सांगतो आहे.
एकलकोंडी राहून डिप्रेशन मध्ये
जाऊ नकोस ग.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .