Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, December 15, 2021

अनोखा सोहळा

१४ डिसेंबर रोजी झाली.
भेटीचा एक अनोखा सोहळा झाला.
ते म्हणजे आपल्या प्रतिलिपी वरील 
माला ताई सबनीस
म्हणजे माझ्या लाडक्या माला मावशी बरं का
मला आठ दहा दिवसा पूर्वीच
माला मावशीचा  मला फोन आला.
मेघा आपण चार पाच जण माझ्या घरी 
एकत्र भेटायच आहे.
तू ,दत्ताभाऊ सांवत, दत्ताकाका जोशी बुवा,
तेजस लिमये.
बापरे एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या सोबत आपण पण त्या यादीत.

मी १४ तारखेची प्रतिक्षा करत होते.
मी सकाळी लवकर लवकर आवरून
तयार झाले.
तेजसचा फोनला मेघा ताई मी जाता जाता
तुला घ्यायला येतो.
आपण एकत्रच जाऊ
दत्ता भाऊ तेथे पोहचले मग आम्ही पण पोहचलो.
थोड्यावेळाने बसून शर्मिलाने जेवायची तयारी केली.
जेवणाचा बेत खूपचं छान होता.
बटाटे पराठे, कटलेट, व्हेज बिर्याणी, कोशिंबीर, गाजराचा हलवा, असा सुंदर बेत होता.
हसतखेळत पोटभर जेवण केले.

मग छान आठवणी जाग्या झाल्या.
माला मावशीच्या बाबांचे हस्त अक्षरातील
पत्र वाचले बाबांचे 


खूप सुंदर विचार होते. बाबांनी त्या काळात ही त्यांनी मुलींना छान शिकवले
त्या काळात पण माला मावशीना नर्सिंगच्या कोस॔ला घातलं.
कुठल्याही मुलींची लग्नाची घाई केली नाही.
बाबांचे किती सुंदर विचार होते.

त्याकाळात माला मावशीच लव्ह मॅरेज झाले.
त्याला ही त्यांच्या घरातील सर्वांची परवानगी होती.
आमच्या ही सर्वांच्या आठवणींना छान उजाळा मिळाला.
शर्मिलाचा स्वभाव पण खूप सुंदर आहे.
शर्मिला पण आमच्या मध्ये छान जुनी मैत्रीण
असल्या सारखे छान गप्पा मारल्या.
गप्पा झाल्यावर मग छान जायफळ घालून मस्त गरमागरम कॉफी झाली.

मग छान भेटवस्तू गिफ्ट दिल्या.
माला मावशीचे भरभरून आशीर्वाद घेऊन भरल्या डोळ्यांनी भरल्या मनानी 
जड अंतःकरणाने जड पावलांनी तेथून निघालो.
असा हा अनोखा सोहळा
सुवर्ण दिन साजरा झाला.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️©️®️



No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time