स्वप्नांचा तर मला आधार आहे.
नवरंगी स्वप्न स्वप्नातील
तू माझी स्वप्नं सुंदरी
हळूवार तुझं स्वप्नात येणं
कपाळाच गोड चुंबन घेणे.
तुझ्या दुनियेत अलगदपणे
मला घेऊन जाणं.
किती सुंदर वाटतं हलकं हलकं
तुझ्या सोबत हळूवारपणे अलगद
तुझ्या दुनियेत शिरणं
असं वाटतं तेथेच
तुझ्या सोबत आयुष्यभर राहावे.
ना कसली चिंता ना कसली काळजी
तुझ्या त्या स्वप्नांच्या दुनियेत छान जगतो आहे.
हेच जीवनाचे सार आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .