Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, December 27, 2021

शरणागती {अलक कथा}

ते एक सुखी समाधानी कुटुंब होतं
लाॅकडाऊन काळात त्यांची नोकरी गेली
नविन नोकरी मिळणं अवघड होत.
साठवलेला पैसा व होत नव्हतं ते सर्व खर्च झाले. लॉकडाऊन नंतर तिने कशीबशी
ओळखीच्या भाजीच्या दुकानात भाजी निवडून द्यायची छोटीशी नोकरी पत्करली.
तो मात्र रोजच नोकरी साठी वणवण करू लागला.
त्यातच टेन्शन मध्ये तो एकदा दारू पिऊन आला. असं रोजच सुरू झालं. तसा तो चांगला विचारी होता. पण टेंन्शन मुळे दारू कडे वळला होता.
एकदा असाच दारू पिऊन आला आणि
विचार करत बसला काय हे आपण असं नव्हतो. एक थेंब ही कधी दारू न पिणारा मी
रोजच सकाळ संध्याकाळ दारू पिऊ लागलो.
विचार करत करत घरीच थांबला 
बायको आल्यावर तिची माफी 
मी पण उद्या पासून काही तरी छोटं काम बघतो.
ती खूश झाली व म्हणाली आमच्या दुकानात
घरपोच भाजी टाकण्याचं काम करणार का
तो हो म्हणाला उद्या पासून आपण दोघ एकत्र जाऊ एकत्र येऊ.
असं करत तो त्या भाजीच्या धंद्यातील सर्व खाच खळगे समजून घेतले.
आणि आपलं स्वत:च भाजीचं दुकान थाटले.
त्याची स्वच्छ ताजी निवडलेल्या घरपोच भाजीच्या दुकानाला बराच प्रतिसाद मिळाला. व एक मोठा भाजी विक्रेता म्हणून नावारूपाला आला.
आज तो एक ताज्या निवडलेल्या भाजीचा कारखानदार आहे.
हे सर्व विचार करून त्याने बायकोशी संवाद साधला.व दारू वर शरणागती पत्करली
म्हणूनच हे शक्य झालं.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time